सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२६ दिनांक ०७/०२/रोजी होणा-या निवडणुकीत सावंतवाडी/ वेंगुर्ला / दोडामार्ग मतदार संघातील जि.प. १७उमेदवार व पंचायत समिती ३४ उमेदवार महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानी विजयी होतील अशी खात्री माजी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी यांनी व्यक्त केली आहे.
तिन्ही तालुक्यामध्ये महायुती उमेदवार हे सुशिक्षित, सुसंस्कृत, विविध योजनांची माहिती असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केलेले, प्रशासनातला अनुभव अशा अनेक गोष्टीमध्ये प्रभावी असलेले उद्या जि.प. व प.स. समितीचा कारभार चालविणार आहेत. आणि अशा अनुभवी उमेदवारांना आपण निवडुन देणे हे मतदारांचे कर्तव्य आहे व हि जबाबदारी मतदार निश्चित पार पाडतील यांत तिळमात्र शंका नाही.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात या मतदार संघाचे गेली चार टर्म प्रतिनिधित्व करणारे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार मा. श्री. दिपकभाई केसरकर साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत आणालेला कोटयावधी रुपयांचा निधी, मतदार संघात केलेली अनेक विकास कामे नागरीकांसाठी केलेल्या मुलभुत सुविधा, विकासाचा प्रगतीचा अजेंठा घेवून केलेले काम मतदारांना ज्ञात आहे. त्याचा या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चितच महायुतीला फायदा होणार आहे.
तसेच रत्नागिरी / सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. नारायणजी राणे साहेब यांचे लाभालेले नेतृत्व तसेच त्यांनी महायुतीसाठी केलेले महत्वपूर्ण असे नेतृत्व जिल्हयामध्ये महायुतीची सत्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकवणार आहे.
जिल्हयातील तिन्ही मतदार संघातील आमदार हे महायुतीचे असल्याने केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असुन भरीव असा निधी सिंधुदुर्ग जिल्हयाला मिळालेला आहे. कुडाळ / मालवण आमदार कर्तव्यदक्ष शिवसेना पक्षाचा बुलंद आवाज प्रभावी नेतृत्व मा.श्री. निलेशजी राणे यांनी केलेली विविध विकास कामे, विधानसभेमध्ये केलेले धकाडेबाज काम ही एक विकासाची दिशा असुन त्याचाही महायुतीला या निवडणुकीत फायदा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना. उदयजी सामंत साहेब यांनी जिल्हयासाठी दिलेला भरीव निधी, माजी शिक्षणमंत्री तथा माजी पालकमंत्री मा. श्री. दिपकभाई केसरकर साहेब यांनी जिल्हयासाठी दिलेला भरीव निधी हा सिंधुदुर्ग जिल्हयाला विकासाच्या प्रक्रियेला पुढे नेणारा ठरणार आहे याचीही जाणिव जिल्हावासीयांना आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये प्रभावीपणे काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. नितेशजी राणे साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नांव भारताच्या नकाशामध्ये पर्यटनदृष्टया विकासीत करण्यासाठी करत असलेले प्रयत्न, सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतशील, शेतक-यांचे प्रश्न, तरुणांना रोजगार, महीलांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, रस्ते यासारख्या मुलभुत सुविधा सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाचे उराशी बाळगलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी चालविलेले प्रयत्न निश्चितच यशस्वी होत आहेत. आणि म्हणुनच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद /पंचायत समितीमध्ये भाजप शिवसेना (शिंदेगट) राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) महायुतीचे सर्व उमेदवार निवडुन येण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी जिल्हयातील भाजप/शिवसेना (शिंदेगट) / राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) जिल्हयातील सर्व जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. त्यात त्यांना निश्चितच यश प्राप्त होणार आहे याची खात्री आहे.
जिल्हयातील सर्व मतदार संघातील असलेली प्रचार यंत्रणा, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मेहनत निश्चितच या निवडणुकीत महायुतीला यश मिळण्यासाठी, तसेच मा.ना. श्री. नारायणजी राणे साहेब, पालकमंत्री मा.ना. श्री. नितेशजी राणे साहेब, आमदार श्री. दिपकभाई केसरकर साहेब, आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांचे मार्गदर्शन या निवडणुकीत यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला निश्चितच यश मिळेल अशी खात्री माजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मा. श्री. अशोक दळवी यांनी व्यक्त केली आहे.



