Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील १५० लोकल रद्द होणार, ‘हे’ आहे कारण.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं होतं. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. रेल्वेकडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यापैकी अजून 128 तासांचं काम बाकी आहे. रेल्वेच्या माहितीनुसार 4 ऑक्टोबरपर्यंत 150 लोकल रद्द होणार आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किमी प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जातील, याचा परिणाम दिवसभरातील वेळापत्रकावर होणार असल्याची माहिती आहे.

सहाव्या लाईनचं काम जसं जसं पूर्ण होईल तशी वेगावरील मर्यादा हटवण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर सकाळच्या वेळी पीक अवर्समध्ये गोरेगाववरुन चार फास्ट लोकल चालवल्या जातात. त्या चार लोकल मेजर ब्लॉकच्या काळात लूप लाईन उपलब्ध नसल्यानं बंद  राहणार आहेत.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार माललाड स्थानकात ब्लॉकच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे. त्यामुळं मालाड स्थानकातील सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 हा प्लॅटफॉर्म क्रमांक  4 म्हणून ओळखले जातील.

सहाव्या लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर मेल एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. त्यामुळं लोकलची संख्या वाढवण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार सहावी लाईन  डिसेंबर 2024 पर्यंत बोरिवलीपर्यंत पोहोचवम्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं चर्चगेट ते बोरिवली पर्यंत लोकल सेवेमध्ये सुधारणा होईल.

30 सप्टेंबरला शेवटच्या लोकलचं वेळापत्रक कसं असेल?

चर्चगेट-विरार लोकल : चर्चगेटहून शेवटची लोकल रात्री11.27 वाजता सुटेल ती विरारला 1.15 वाजता पोहोचेल.

चर्चगेट-अंधेरी लोकल
चर्चगेटहून अंधेरीसाठी लोकल 1.00 वाजता सुटेल ती 1.35 वाजता अंधेरीला पोहोचेल.

बोरिवली- चर्चगेट लोकल
बोरिवलीहून लोकल 00.10 वाजता सुटेल ती 01.15 ला चर्चगेटला पोहोचेल.

गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
गोरेगावहून 00.07 ला लोकल सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 1.02 ला पोहोचेल.

विरार-बोरिवली लोकल
ही अतिरिक्त लोकल चालवली जाईल. विरारवरुन 03.25 ला सुटेल ती बोरिवलीत 4.00 वाजता पोहोचेल.

बोरिवली-चर्चगेट धिमी लोकल
अतिरिक्त लोकल बोरिवलीवरुन 04.25 सुटेल ती चर्चगेटला 05.30 वाजता पोहोचेल.

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट लाईन आणि मालाड अप आणि डाऊन फास्ट ट्रॅक आणि स्लो ट्रॅकवर घेतला जाईल. सोमवारी रात्री 12.30 वाजता ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजतेपर्यंत म्हणजेच चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार या कालावधीत लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली पर्यंत चालवल्या जातील. या काळात मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10  ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles