मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिने लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अपूर्वाने तनुज गोवळकरशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मोजकेच पाहुणे उपस्थित होते. ‘आयुष्याने माझी परीक्षा घेतली, अनेक चढउतार अनुभवले, तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे, असंही अपूर्वाने स्पष्ट केलं. तनुजचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास लक्षात येतं की त्याला फिरायची खूप आवड आहे आणि तो विविध देशांमध्ये फिरला आहे.



