गोवा : सातार्डा – तरचावाडा येथील प्रशांत गजानन बागकर (वय-५० वर्षें) यांचे कुठ्ठाळी – गोवा येथे सातार्डा वरून वास्को येथे जात असतांना दुचाकी व कदंबा मधील समोरासमोर झालेल्या अपघातात निधन झाले.ही घटना रविवार दि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० च्या सुमारास घडली.गंभीर जखमी असलेल्या प्रशांतला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.प्रशांत हा नोकरी निमित्त गोव्यात असायचा.शनिवारी सातार्डा – तरचावाडा येथे महापुरुष मंदिरात सत्यनारायण महापूजा असल्याने तो आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या सातार्डा येथील मूळ घरी आला होता.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली जाण्याने सातार्डा व गोवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



