सावंतवाडी: शिवजयंतीनिमित्त येत्या गुरुवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वराज्य रक्षक युवक मंडळ, कलंबिस्त गणशेळवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत कलंबिस्त, गणशेळवाडी शिवस्मारक ता. सावंतवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून रक्तदान करावे व या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या रक्तदात्यांनी रवींद्र तावडे (9421371483), रविकमल सावंत (9527969996), दिपक सावंत (7588929728), रघुनाथ सावंत (9422738638), विक्रांत तावडे (9480000694), प्रथमेश सावंत (9422767547), सयाजी पवार (7776956165), सचिन सावंत (9423297605) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर (9420646400) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.



