सावंतवाडीत २२ फेब्रुवारीला एकदिवसीय मोफत बाल उपक्रम शिबिराचे आयोजन.

सावंतवाडी : लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी “Create • Learn • Play • Craft • Draw • Expression” या संकल्पनेवर आधारित एक दिवसीय मोफत बाल उपक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मिती, शिक्षण, खेळ, हस्तकला, चित्रकला आणि अभिव्यक्ती या विविध घटकांचा समावेश असलेले हे शिबिर मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
हे शिबिर रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. ६ वर्षे व त्यावरील मुलांसाठी हे शिबिर खुले असून एकूण कालावधी दोन तासांचा राहणार आहे.
शिबिरामध्ये चित्रकला, हस्तकला, मजेदार खेळ, शिकत-खेळत उपक्रम तसेच सर्जनशील कृतींचा समावेश असेल. या उपक्रमांद्वारे मुलांना स्वतःची कल्पकता आणि अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळणार आहे. मुलांच्या आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.
नोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुक पालकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ७५८८१०९९० किंवा ९४०५८३०२८८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles