पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांची ‘दिल से साथ’! ; कार्यकर्त्यांसोबत सहभागी होत सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात केले भव्य नियोजन.

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम सोबत सहभागी होत पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत यासाठी संपर्क कार्यालयात प्रक्षेपण कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी विशाल परब म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles