कुडाळ येथे १ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. ; स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन.

कुडाळ : येथील स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले असुन. यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या करत आहे. ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग. हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा.. याकरिता यावर्षी म्हणजे आठव्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने संपन्न होणार आहे.

महाविजेता स्वस्तिक श्री. 30.000 रोख + चषक + किताब तसेच बेस्ट पोझर 5000, मोस्ट इमप्रोव्हेड 5000 अशी घवघवीत बक्षीसं दिले जाणार आहेत.

स्पर्धा पाच गटांमध्ये होणार असून 0KG – 55KG ,,55 KG – 60 KG,, 60KG – 65KG ,, 65KG-70kG आणि 70+KG
प्रत्येक गटामध्ये
प्रथम क्रमांक 3,5,55 + चषक// द्वितीय क्रमांक 3,1,11+ चषक// तृतीय क्रमांक 2,5,55+चषक// चतुर्थ क्रमांक 2,1,11+मेडल// पाचवा क्रमांक 1,5,55+मेडल// सहावा क्रमांक 1,1,11+मेडल//

– मेन्स फिजिक्स स्पर्धा –
प्रथम 5000+चषक
व्दितीय 4000+चषक
तृतीय 3000+ चषक
चतुर्थ 2000+ चषक
पाचवा 1000+ चषक

या स्पर्धेचे ठिकाण एस एन देसाई (कॉलेज ) चौक .1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वा. असून मोठ्या संख्येत स्पर्धकांनी सहभाग घ्यावा व रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles