जनसेवेचा ध्यास हाच माझा श्वास ! : संदीप गावडे. ; जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान.

सावंतवाडी : शिक्षण हे समाजातील महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणाच्या मंदिरात आवश्यक सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामुळे यापुढे देखील शैक्षणिक क्षेत्रात जे काही करता येईल, ते करण्याचा आपला मानस आहे, माझ्या तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आणि जनसेवा हाच आपला श्वास आहे, असे उद्गार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी काढले. जनता विद्यालय तळवडे येथे प्रशालेलासंदिप गावडे यांच्या माध्यमातून १४ टेबल प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. गावडे बोलत होते

यावेळी जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, शक्तिकेंद्र प्रमुख दादा परब, भूषण पेडणेकर, सुशांत गावडे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles