सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा–सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ८.४५ वाजता आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमी, पालक व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात येणार आहेत.



