बेवारस आजारी वृद्धाला सामाजिक बांधिलकी अन् सावंतवाडी पोलिसांचा सहारा! ; उपचारार्थ केले हॉस्पिटलमध्ये दाखल.

सावंतवाडी : येथील स्टेट बँक नजीक बेवारस वृद्ध आजारी अवस्थेत आढळला.  सामाजिक बांधिलकी व पोलिसांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आजारी अवस्थेत  असलेला एक बेवारस वृद्ध सावंतवाडी येथील स्टेट बँक नजीक आज सकाळी १० च्या सुमारास आढळला असता पोलीस कर्मचारी अंजली पवार यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांची संपर्क साधला.

दरम्यान तात्काळ रवी जाधव घटनास्थळी पोहोचले आणि सदर आजारी वृद्धाला ॲम्बुलन्सच्या साह्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर वृद्धाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन अथवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांशी संपर्क साधावा,  असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, पोलीस कर्मचारी संजली पवार, पोलीस कॉन्स्टेबल भूषण भोवर, सामाजिक कार्यकर्ते सुनील आंबेरकर, अनिश बिजली व ॲम्बुलन्स चालक सचिन राणे यांचे मदत कार्य लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles