नगराध्यक्षांचा कोणताही अवमान केला नाही, त्यांनी उगीच भावनिक राजकारण करू नये! ; संजू परब यांचे प्रत्युत्तर.

सावंतवाडी : सावंतवाडीच्या नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी जनतेला भावनिक करून राजकारण करू नये. ज्याप्रमाणे तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे, त्याप्रमाणे जनतेने आम्हालाही निवडून दिले आहे. आम्ही काही वरून पडलेलो नाहीत. त्यामुळे चुकी दिसेल त्याला मी विरोध करणारच. संजू परब आहे तिथं चुकीला विरोध होणारचं, त्यामुळे जनतेला दिशाभूल करून उगीचच भावनिक आधार मिळवू नये, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आज लगवला.

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या सभेमध्ये नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोंसले ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. नगराध्यक्ष हे रजेवर असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन सहभागी होऊ नये व त्यांना सहभागी व्हायचे असेल तर प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी बोलू नये, अशी हरकत संजू परब यांनी घेतली होती.

दरम्यान सौ. भोंसले यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे आपल्याला चर्चेत ऑनलाईन सहभागासाठी विरोध करून त्यांनी महिलांचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. याबाबत आज संजू परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

नगराध्यक्ष सौ. भोंसले या रजेवर असून त्यांनी आपला कार्यभार उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना दिला आहे. त्यामुळे त्यांनी सभेत ऑनलाईन सहभागी होणे योग्य नाही. नियमाने त्यांना रजेवर असताना ऑनलाईन सगळे सहभागी होता येत असते तर मी घेतलेल्या हरकतीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण ते काहीच बोलले नाहीत. सभेचे नियम प्रभारी नगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांना माहित असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया बंद केली. त्यांनी योग्य निर्णय घेतला म्हणून मी पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो, असेही संजू परब म्हणाले.

तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकृत फेसबुकवर फक्त विधायक कामांबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. मात्र त्या ठिकाणी नगराध्यक्ष श्रद्धाराजे यांनी आपल्या वैयक्तिक काही पोस्ट टाकून राजकारणात करण्यात आले आहे, असे देखील संजू परब म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles