आपली बोली ही आपली प्रथम ओळख ! : विवेक तावडे. ; वैभववाडी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘उत्सव बोलींचा’ कार्यक्रम दिमाखात साजरा.

वैभववाडी : मराठी ही आपली राजभाषा आहे. परंतु आपली बोलीभाषा ही आपली पहिली ओळख असून ती आपली मातृभाषा आहे. ज्या भाषेतून आपण प्रथम बोलायला लागतो ती आपली बोली भाषा असते.प्रत्येकाला आपल्या बोली भाषेचा आणि मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, असे विवेक तावडे यांनी सांगितले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित “मराठी राजभाषा दिन” कार्यक्रम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मारूती कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

“उत्सव बोलींचा” स्थानिक बोलीतील विशेष सादरीकरण करून मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.तावडे बोलत होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. डॉ. कुंभार यांनी मराठी भाषा आणि तिचे विविध पैलू उलगडताना भाषेची आजवरची वाटचाल मांडली. मराठी भाषेतील बलस्थाने म्हणजे साहित्य निर्मिती होय असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर श्री.विवेक तावडे, श्री.मनिष वेदक, विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, प्रा.संजीवनी पाटील, डॉ. बाजीराव इंगवले, प्रा. आनंदा कांबळे, डॉ. रमेश गुलदे, डॉ.वंदना काकडे उपस्थित होते.
कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. अशा या राजभाषा दिनाचे औचित्य साधत उत्सव बोलींचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
बोली या झऱ्यासारख्या असतात. त्यांच्यामुळेच प्रमाण भाषेची नदी वाहती राहते. म्हणून बोली तितक्याच महत्त्वाच्या आहेत.या बोली म्हणजे आपली संस्कृती असते एक संचित असते. म्हणून त्या जपायला हव्यात. बोली टिकल्या तर हे सांस्कृतिक संचित नदीसारखेच वाहते राहते आणि भाषा कोणत्याही काळावर टिकून राहते.
यासाठी उत्सव बोलींचा ही संकल्पना घेऊन मराठी राजभाषा दिन साजरा करीत आहोत असे प्रा.संजीवनी पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी सेजल रासम, आरती तांबे, वैष्णवी रेवडेकर, प्रेरणा तावडे, प्राची तावडे, मिसबा मुल्ला या विद्यार्थ्यांसह प्रा. प्रथमेश दाणी, डॉ.नंदू हेदूळकर, डॉ.रमेश गुलदे, डॉ.अजित दिघे, डॉ. विजय पैठणे, डॉ.किरण पाटील, प्रा.निलेश कारेकर, प्रा.सचिन भास्कर, प्रा.विजय शिंदे, प्रा.आनंदा कांबळे, डॉ. दर्शना कोरगावकर, डॉ.केशव पाखरे यांनी आपापल्या बोली भाषेतून सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी गायकवाड हिने केले तर आभार प्रा.रणजीत पाटील यांनी खास बोलीतून मांडले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles