बेरोजगार तरुणाईच्या आत्मनिर्भरतेसाठी ‘ह्यांचे’ सकारात्मक पाऊल ! : ॲड. नकुल पार्सेकर. ; मालवण महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन.

मालवण : किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना २९२५/२६ अंतर्गत तृषा इन्फोटेक व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये फॅशन डिझायनिंग, स्ट्रीट फूड वेंडर व मेकअप आर्टिस्ट हे तीन कोर्स सुरू करण्यात आले. हे कोर्स मोफत असून या कोर्सना सोळा ते पंचेचाळीस या वयोगटातील युवक युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला.


या कोर्सची सविस्तर माहिती तृषा इन्फोटेकचे संचालक रघुनाथ तानावडे यांनी दिली. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह ॲड. नकुल पार्सेकर यांनी बेरोजगार तरुणाईच्या हाताला काम मिळावे, त्यांना आर्थिक संपन्नता यावी, ते आत्मनिर्भर बनावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ही योजना सुरू केलेली असून त्याचा लाभ आपल्या महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना व्हावा, म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापनाने योग्य निर्णय घेतलेला असून यापुढेही आणखीन काही कोर्स सुरू करावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सौ. राजश्री सामंत यानी विनाशुल्क उपलब्ध झालेल्या या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी काळाची गरज ओळखून कौशल्य विकासाची कास धरूनच शिक्षण दिले पाहिजे. ज्यामुळे रोजगार निर्मिती होवू शकते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य कैलास राबते यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग व व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles