कर्तृत्ववान महिलांचा कोकण संस्थेच्यावतीने महिलादिनी सन्मान.

कुडाळ : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगराळ व दुर्गम भागातील महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान महिलेचा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 07 मार्च 2026 रोजी माणगाव येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे महिला सरपंच, पोलिस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट, महिला डॉक्टर, महिला उद्योजिका, प्रगतशील महिला शेतकरी, आरोग्य सेविका, महिला वकील, महिला पोलीस, बचत गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ पदाधिकारी, शून्यातून विश्व उभ करणारी माता यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव करणे आणि त्यांना समाजात प्रोत्साहन देणे आहे. अंगणवाडी सेविकांनी आपल्या अथक परिश्रमाने ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, पोषण तसेच प्राथमिक शिक्षणाबाबत नेहमीच मोलाचे योगदान देत असतात. त्यांनी लहान मुलांच्या पोषणाची विशेष काळजी घेतली असून, त्यांना योग्य आहार आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. या सेविकांनी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्याच बरोबर आशा वर्कर्स यांनी ही महिलांच्या आरोग्याच्या सुधारासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. मुलींची आरोग्य तपासणी करून लसीकरण, पोषण आहार यांसारख्या आरोग्यविषयक सेवांचा जनसामान्यांना लाभ मिळवून दिला आहे . आरोग्यविषयक जनजागृती कार्य आणि घरोघरी जाऊन केलेले सेवा कार्य कौतुकास्पद आहे. ज्यामुळे ग्रामीण समाजातील महिलांच्या आणि मुलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आले आहेत.


यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच मनिषा भोसले, स्त्री रोग तज्ञ डॉ. मेधा फणसळकर, पोलीस शर्मिला पाडगावकर, प्रभाग संघ व्यवस्थापक साक्षी मेस्त्री, शिक्षिका त्रिवेणी थिटे, देविका भोसले, पोलीस पाटील अदिती देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिला आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण आणि शिक्षणात मोठी प्रगती झाली आहे.
सन्मानित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे आभार मानले.
स्त्री रोग तज्ञ डॉ. मेधा फणसळकर, शिक्षिका त्रिवेणी थिटे, देविका भोसले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी माणगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ११५ महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी तर प्रास्ताविक विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी केले. आभार सत्यवान भगत यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन कोकण संस्थेचे कार्यकर्ते गौरी आडेलकर, अवंती धुरी, शशिकांत कासले, अमोल गुराम, चेतन धरणे, रुचा पेडणेकर, वैष्णवी म्हाडगुत, तन्वी केसरकर, शुभम लोणाग्रे, हर्षदा कोरगावकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles