शिवसेनेने साजरा केला भावस्पर्शी महिला दिन! ; अंकुर महिला निवारा केंद्रात जावून दिला ‘मायेचा अंकुर’.

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी येथील अंकुर महिला निवारा केंद्रात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात महिला दिन साजरा करण्यात आला. समाजातील विविध कारणांनी निवारा केंद्रात राहणाऱ्या महिलांशी आणि लहान मुलींशी संवाद साधत त्यांना मायेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी निवारा केंद्रातील लहान मुलींना पारंपरिक पद्धतीने ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना खाऊ व भेटवस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच निवारा केंद्रातील महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना धीर देण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना आणि चिमुकल्यांना एक वेगळी उब आणि आपुलकीची जाणीव झाली.
कार्यक्रमादरम्यान महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन देखील देण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत–कविटकर यांनी महिलांच्या हक्कांबाबत, कायद्यांतर्गत मिळणाऱ्या संरक्षणाबाबत तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तर शिवानी पाटकर यांनी ‘महिलांचे आणि प्रत्येक व्यक्तीचे मानवी हक्क’  याबाबत मार्गदर्शन करत महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत–कविटकर, भारती परब, शिवानी पाटकर, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सर्वांनी मिळून निवारा केंद्रातील महिलांसोबत महिला दिन साजरा करत त्यांना सन्मान, प्रेम आणि आधार देण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमामुळे निवारा केंद्रातील महिलांना “आपण एकटे नाही” ही भावना मिळाली आणि महिला दिनाचे खरे महत्त्व अधोरेखित झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles