”आज रात्री आम्ही…!” ; पराभवानंतर न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरने केलं मोठं विधान.

अहमदाबाद : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मिचेल सँटनरने पॅट कमिन्ससारखी वल्गना करून भारताला डिवचलं होतं. इतकंच काय तर अहमदाबाद स्टेडियमधील प्रेक्षकांना गप्प करू असंही म्हणाला होता. तसेच खेळपट्टीचे फोटो काढून पॅट कमिन्सची स्टाईलही मारली होती. नाणेफेकीचा कौलही सँटनरच्या बाजूने लागला. पण टीम इंडियाने सँटनरच्या या वक्तव्याची सर्व हवाच काढून टाकली. नाणेफेकीचा न्यूझीलंडने जिंकला असला तरी या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड दिसली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. इशान किशनने त्यात आणखी भर घातली. शिवम दुबेने शेवटी फटकेबाजी करून न्यूझीलंडच्या विजयाची हवा काढून टाकली. 255 धावांचा पाठलाग करणं काही सोपी गोष्ट नाही हे कळून चुकलं होतं. त्यामुळे भारताचा विजय हा पहिल्या डावातच निश्चित झाला होता. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला. जेतेपद हुकल्यानंतर मिचेल सँटनरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याबद्दल मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहेच, संपूर्ण स्पर्धेत आमच्यासमोर किती आव्हाने होती, पण आम्ही प्रत्येक आव्हानावर तितक्याच ताकदीने मात केली आणि चांगले खेळलो. तआज रात्री एका चांगल्या संघाने आणि या मोठ्या प्रेक्षकांसमोर आमच्यासमोर एक उत्तम खेळ दाखवला. तरीही मला माझ्या मुलांचा अभिमान आहे.” या सामन्यात न्यूझीलंडचा कुठे नव्हता. खऱ्या अर्थाने हा सामना एकतर्फी झाला असंच म्हणावं लागेल.

मिचेल सँटनर पुढे म्हणाला की, “हो, मला वाटते की प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी घेतली. मला वाटते की आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना करावा लागला आणि पुढे जाणे नक्कीच चांगले होते. आम्ही सुपर 8 मध्ये आणि नंतर उपांत्य फेरीत खरोखर चांगले खेळलो, पण मला वाटते की आज रात्री आम्ही कमी पडलो.” भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात तिसरं जेतेपद आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles