आ. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांचा उत्साहपूर्ण सत्कार!

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. सुस्मिता जाधव यांचा भव्य व उत्साहपूर्ण सत्कार माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. शिवसेनेच्या वतीने जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर व तालुकाध्यक्ष नारायण राणे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुस्मिता जाधव यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीमार्फत विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी विभागप्रमुख राजेश विर्नोडकर, तालुका संघटक संजय गावडे, व्हा. चेअरमन राजन रेडकर, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे, संघटक विशाल परब, उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles