गणिताचे उत्तर चुकले म्हणून मॉनिटर संतापला अन्… ; नंतर घडलं ते भयानकचं!

पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ गणिताच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याच्या क्षुल्लक कारणावरून इयत्ता सातवीतील तब्बल १५ विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मारहाण वर्गातील मॉनिटरने थेट शिक्षकांच्या देखरेखीखाली केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गाचा गणिताचा तास सुरू होता. यावेळी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणिताची काही उदाहरणे सोद्व्न्यस दिली होती. ज्या विद्यार्थ्यांची उत्तरे चुकली, त्यांना शिक्षा म्हणून वर्गातील मॉनिटरने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठले असून काही विद्यार्थ्यांना जबर दुखापत झाली आहे.

शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह –

शाळेत शिस्त लावण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे शारीरिक अत्याचार करणे कायद्याने गुन्हा आहे. या घटनेत शिक्षकांनी स्वतः मारहाण न करता वर्ग मॉनिटरला मारहाण करायला लावली. हे सर्व त्यांच्या समोरच घडल्याने शाळा प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले जात आहेत. गुरुजींनीच त्याला मारायला सांगितले असा दावा घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. ही शाळा सुटल्यानंतर मुले घरी गेल्यावर हा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्यांच्या अंगावरील खुणा पाहून पालकांनी तातडीने शाळेत धाव घेतली. मात्र, शाळा प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित शिक्षक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई –

या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. आरटीई कायद्यानुसार शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करवून घेणे हा प्रकार गंभीर मानला जात आहे. शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून तिथे मुलांना अशा प्रकारे दहशतीखाली ठेवणे निषेधार्ह आहे. या प्रकरणातील दोषी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles