सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील एका ठिकाणी संबंधित कामगाराचा मृतदेह झाडाच्या खाली मृतदेह असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरू आहे.मात्र मृतदेह ज्या संशयास्पद अवस्थेत सापडला आहे, त्यावरून ही आत्महत्या आहे की घातपात?, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.



