सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे गावचे पोलीस पाटील अजित प्रभाकर वैज यांनी दिले खबरी वरून एका अज्ञात व्यक्तीने काजूच्या झाडाला जवळपास लावले बाबत आकस्मिक मृत्यू सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
11.03.2026 रोजी दुपारी 3.20 वा चे पुर्वी, श्री. कामत राहणार तळवडे यांचे निरवडे नाडकर्णीवाडी या ठिकाणच्या काजूच्या बागेमध्ये एक अनोळखी कामगार काजूच्या झाडाला गळफास लावले स्थितीत दिसून आला. सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव त्यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. आजूबाजूला चौकशी केली मात्र काही ओळखी बाबत माहिती न मिळाल्याने पुढील कार्यवाही करता प्रेत सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले असून, मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. कोणाला नमूद फोटोमधील व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.



