अवैध खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वनाधिकाऱ्यांनी पकडला! ; सिंधुदुर्गवासियांचे लक्ष शिक्षेकडे.

सावंतवाडी : तालुक्यातील बांदा–इन्सुली दरम्यान अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (एम. एच. – 07 ए. जे. – 1188) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित वाहन चालकासह लाकूड वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले खैर लाकूड हे दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसरातून तोडण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित लाकूडतोड्या व वाहतूक साखळीतील इतर व्यक्तींवरही वन विभाग कठोर कारवाई करणार का, याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी अशा अवैध लाकूडतोड व वाहतुकीवर आळा बसणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणात दोषींवर योग्य ती शिक्षा होऊन भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles