सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ मार्च रोजी दुसरी उर्जा मित्र बैठक, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी होणार बैठक. ; तालुका आणि उपविभाग स्तरावर होणार आयोजन.

वैभववाडी : राज्यातील इतर जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येते.

जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या दि.२४ नोव्हेंबर,२०२५ रोजीच्या
बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.सुरेश पाटील यांनी केली होती.
त्यानुसार कार्यकारी अभियंता, महावितरण कणकवली व कुडाळ यांनी तालुका व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठक आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे प्रतिनिधी आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य यांनी विज ग्राहक आणि विज प्रशासन यांच्या मधील समन्वयाची भूमिका बजावून पहिली उर्जा मित्र बैठक यशस्वी केली आहे.
या बैठकीत वीजपुरवठा, बिलिंग, स्मार्ट मिटर, मीटर दुरुस्ती, खांब-तार बदल, तक्रारींची नोंद व निकाली काढणे, तसेच विज ग्राहकांचा महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद झाल्याने काही विज समस्या निकाली काढण्यात आल्या. मार्च महिन्यातील उर्जा मित्र बैठक बुधवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी ११ वा. तालुका आणि उपविभाग स्तरावर होणार आहे. तरी जिल्ह्यातील विज
ग्राहकांनी उर्जा मित्र बैठकीत सहभागी होऊन आपल्या तक्रारी, सूचना व अभिप्राय मांडावेत, ज्यामुळे वीजसेवा अधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
उर्जा मित्र बैठकांबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या तालुका शाखांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी
संस्थेचे जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.सुरेश पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा.
दुसरी उर्जा मित्र बैठक यशस्वी करावी असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles