भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात? ; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया काय?

मुंबई : कॅप्टन अशोक खरात, ज्याला भोंदू बाबा म्हणून ओळखले जाते, याच्याविरोधात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री आणि मोठ्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. या प्रकरणातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. राजकीय नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. त्यांनी सांगितले की, “मला ज्यावेळी बोलायचं असेल त्यावेळी मी नक्की बोलेन,” असे वक्तव्य करत त्यांनी चाकणकर यांच्यावर अधिक भाष्य टाळले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles