सावंतवाडीचे पर्यटन बहरणार!, ‘रोप-वे’ आणि ‘बोटींग’साठी पालिकेचा पुढाकार! : उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली पाहणी.

सावंतवाडी : शहराच्या पर्यटनाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. शहराबाहेरून गेलेला महामार्ग आणि रेल्वेमुळे पर्यटनात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता ‘मोती तलाव ते नरेंद्र डोंगर’ असा भव्य रोप-वे उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मोती तलावाकाठी ‘खाऊगल्ली’ उभारणार! : राजवाड्यासमोर ११ गुंठे जागेत भव्य खाऊगल्ली साकारणार आहे. १ कोटींचा निधी मंजूर.

स्थानिकांना प्राधान्य: खाऊगल्लीतील स्टॉल्ससाठी स्थानिक महिला आणि तरुणांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे.

बोटींग प्रकल्प : तलावातील बंद असलेली बोटींग सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार.

नरेद्र डोंगर रोप – वे: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोप-वे उभारण्याची महायुती नेत्यांकडे मागणी करणार.

उद्यान सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी नगरसेविकांसह आज खाऊगल्लीच्या जागेची पाहणी केली. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेचा गट आग्रही आहे.

“सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटकांना शहरात खेचून आणण्यासाठी रोप-वे आणि बोटींग प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे सत्यार्थ चॅनेललशी बोलताना उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles