चाकणकरांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना सहआरोपी करून अटक करा! ; सुषमा अंधारे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट लिहीत चाकरकरांवर टीका केली आहे. ‘ चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही.चाकणकरांना जर स्वेच्छेने ने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या.

चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरात ची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे.

चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये.

नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles