दैवी शक्ती, तांब्या, मंत्र आणि… ; भोंदू बाबा अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’तील 9 धक्कादायक कारनामे.

नाशिक : महाराष्ट्रात सर्वत्र फक्त एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… या भोंदू बाबाने भक्तीच्या नावाखाली श्रीमंत व्यक्तींकडून पैसे उकळले, तर सामान्य घरातील महिलासोबत बलात्कार केले… मी कृष्णाचा अवतार आहे… असं सांगत भोंदू बाबा गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून, त्यांना गुंगीचं ओषध देत त्यांच्यावर अत्याचार केलं. आतापर्यंत जवळपास तीन महिलांनी बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे… बाबाचं खरं रुप समोर आल्यानंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एसआयटीचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, भोंदू बाबाबद्दल तसतसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशी देखील माहिती समोर येत आहे की, गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर भोंडू बाबाने मौनव्रत पाळलं होतं. यामुळे पोलिसांच्या चौकशीत अडथळा निर्माण झाला.

भोंदू बाबा अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’तील 9 धक्कादायक कारनामे –

संस्थेला शेतकऱ्यांचं पाणी – 2020 मध्ये एक सरकारी आदेश जारी करण्यात आलेला, ज्यामध्ये श्री शिवनिका संस्थेला पाणी वाटप करण्यात आलेलं, भोंडू बाबाची संस्था नाशिकच्या मिरगाव येथे आहे. 31 जुलै 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, दरना धरणातून 39 लाख लिटर पाणी वाटप करण्यात आलं. हे पाणी सिन्नरसारख्या दुष्काळग्रस्त भागांना देण्यात आलेलं . शेतकऱ्यांसाठी असलेलं पाणी एका खाजगी संस्थेकडे का वळवण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भोंदू बाबा नाही विकृत बाब – प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी यावर मोठं वक्तव्य केलं होतं. शकडो महिलांचं लैंगिक शोषण बाबाने केलं आहे. त्यामुळे हा भोंदू बाबा नाही तर, विकृत बाबा आहे… एवढंच नाही तर, येत्या काळात महिलांची संख्या वाढेल अशी शक्यता देखील दमानिया यांनी वर्तवली आहे.

पाण्यात मिसळलं व्हायग्रा – दामानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, भोंदू बाबा ओशनो जल तयार करयचा… पाण्यामध्ये व्हायग्रा टाकायचा… हेच पाणी घेण्यासाठी अनेक दिग्गज लोकांच्या देखील रांगा लागलेल्या असायच्या… पाणी घेण्यासाठी मोठे नेत गाड्या आणि हेलिकॉप्टर देखील पाठवायचे…

15 भाषा येत असल्याचा दावा – अशोक खरात स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणत होता. त्याने संपूर्ण जग पाहिले असल्याचा दावा केला, एवढंच नाही तर, 154 देशांना भेटी दिल्या… 22 वर्ष समुद्रात काम केलं आणि नाशिकला परतल्यावर त्याने सिन्नर टेकड्यांमध्ये एक मंदिर बांधलं. स्वतःला ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून घेण्यास त्याने सुरुवात केली आणि प्रभावशाली लोकांना भेटू लागला.

दैवी शक्तींच्या नावाखाली शोषण – नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 35 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलने आरोप केले की, खरात याने दैवी शक्ती असल्याचं सांगत विश्वास संपादन केलं. त्यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावलं. नशेचं पाणी दिलं आणि लैंगिक शोषण केलं… हे तब्बल 2022 पासून 2025 पर्यंत सुरु होतं…

मी तुझा कृष्ण तू माझी राधा – अशोक खरात याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये धक्कादायक खुलास समोर आले आहे. महिलांना भक्तीच्या जाळ्यात फसवत म्हणायचा, ‘मैं कृष्ण का अवतार तुम राधा’, त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा…

मंत्र बोलण्याचं नाटक – महिलांच्या डोक्यावर तांब्या ठेवून भोंदू बाबा त्यांच्या कानात मंत्र बोलण्याचं नाटक करायचा… त्याआधी महिलांनी पेढा, कडू आणि खारट चव असलेलं पाणी द्यायचा… ज्यामुळे महिलांना नशा चढायची… त्यानंतर बाबा महिलांसोबत अश्लील कृत्य करायचा…

200 कोटी रुपयांची संपत्ती – मर्चंट नेव्हीमध्ये सेवा नेकरी केल्यानंतर बाबा बनलेल्या अशोक खरात याच्याकडे 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचं आढळून आलं आहे. काँग्रेस पक्षाने त्याला महाराष्ट्राचा आसाराम म्हटलं आहे. अशोक खरात याच्या मालकीची नाशिकच्या पाथर्डी येथे 30 एकर जमीन असल्याचे उघड झालं आहे.

राजकीय नेते आणि अधिकारी घ्यायचे सल्ला – असं देखील समोर आलं आहे की, अशोक खरात याचा प्रभाव दिवसागणिक वाढत असल्यामुळे अनेक नेते मंडळी आणि सेलिब्रिटी देखील त्याच्या संपर्कात होते… अनेक मोठे नेते आणि अधिकारी देखील भोंदू बाबाकडून सल्ला घेत होते… आता याप्रकरणी भोंदू बाबा तुरुंगात असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles