बयाजी बुराण यांना सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळातर्फे विशेष पुरस्कार प्रदान! ; जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलन उत्साहात संपन्न.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलन व विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा उत्साहात पार पडला. रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या संमेलनात ‘स्व. हणमंत गोविंद टेंबळी स्मृती आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार’, ‘आदर्श प्रधानाध्यापक पुरस्कार’, ‘आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार’ तसेच ‘विशेष सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले . यात कनेडी हायस्कूलचे उपक्रमशील पर्यवेक्षक बयाजी बुराण यांना हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसार बद्दल तसेच त्यांच्या प्रामाणिक शैक्षणिक सेवेबद्दल विशेष पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यंदाच्या पुरस्कारप्राप्तांमध्ये बयाजी बुराण, सौ. आसावरी सुनील कदम, श्री. सत्यपाल सीताराम लाडनावकर यांच्यासह सौ. विभावरी विद्यासागर देसाई, सौ. शारदा घनश्याम गावडे, सौ. अनुजा अमरसेन सावंत, श्री. महेंद्र विठ्ठल पारकर, श्री. धाकू महादेव उबरे, श्री. राजेश जनार्दन नाईक, सौ. विशाल प्रमोद कांबळे, सौ. श्रेया सुरेशचंद्र तावडे आदींचा समावेश आहे.
हिंदी भाषा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles