विवाहित महिलेवर अत्याचारप्रकरणी एकास सशर्त जामीन मंजूर.

कणकवली : आपला मित्र परदेशी आहे याचा गैरफायदा घेऊन त्याच्या पत्नीला शासकीय कामाच्या निमित्ताने बाहेर बोलावून शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुबारक शहाबुद्दीन साटविलकर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जाचमुचलक्याच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

साधारण मार्च २०२३ ते मे २०२५ या कालावधीत फिर्यादी महिलेचे पती परदेशात असल्याने आरोपीने त्यांची शासकीय कामे तालुक्याच्या ठिकाणी असल्याचे सांगून विवाहितेला बोलविले. त्यानंतर तेथे शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या घटनेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करून मुलांना गायब करण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर मा.न्या.सं. कलम ६४, (१), ६४ (२), ७४.७५, ७८ तसेच ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीच्या वतीने दाखल जामीन अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करताना पीडिता अथवा कुटुंबीयांशी कोणतीही संबंध ठेऊ नये, साक्षी पुराव्यात ढवळाढवळ करू नये, अशा अटी घातल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles