वेर्ले येथे १२ एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन. ; अटल प्रतिष्ठान व आजी-माजी सैनिक उत्कर्ष मंडळ वेर्ले यांचा पुढाकार.

सावंतवाडी: येथील अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ वेर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक श्री बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेर्ले येथील सैनिक भवनात रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ९.३०ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन केलेले असून यावेळी या शिबीरात दहापेक्षा जास्त डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. अभिजीत चितारी (फिजीशियन,), डॉ. राजेश नवांगुळ (स्त्री रोग तज्ज्ञ व टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट),  डॉ. नेहा सावंत (नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. सागर कोल्हे (मूत्ररोग तज्ज्ञ), डॉ.संदीप सावंत ( बालरोग तज्ज्ञ), डॉ. निखील अवधूत (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ.अनिकेत वजराटकर (जनरल फिजीशियन), डॉ. विनय सुर्यवंशी (दंतरोग तज्ज्ञ), डॉ. संजीव लिंगवत (होमिओपॅथी) अशा तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून या शिबीराचे उद्घाटन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी वेर्लेच्या सरपंच सौ. सुचिता राऊळ, सांगेली जि.प.सदस्या सौ. शिवानी नाईक, वेर्ले पंचायत समिती सदस्य  प्रथमेश सावंत, पोलीस पाटील सौ. प्रियांका सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात रुग्णांची तपासणी करून निदान केल्यावर मोफत औषधोपचार केला जाणार असून सामाजिक कार्यकर्ते, केसरी फार्माचे राजेंद्र उर्फ राजू केसरकर यानी यासाठी औषधे प्रायोजित केलेली आहेत.
तरी गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर, कार्यवाह रघुनाथ तानावडे, माजी सैनिक संघटनेचे सचिव हनुमंत राणे आदि पदाधिकाऱ्यांनी केले असून अधिक माहितीसाठी बाळकृष्ण लिंगवत (मोबाईल क्रमांक – ९४०५९२२४०१) वर संपर्क साधावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles