वैभव सूर्यवंशी टिम इंडियात?, केव्हा लॉटरी लागणार? ; कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? ‘ही’ आहे मोठी अपडेट.

मुंबई : मागील दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यवंशीचे वैभव दिसत आहे. स्थानिक पातळीवरील क्रिकेटपासून ते 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकपातील त्याच्या धडाकेबाज कामगिरीने तो लंबी रेस का घोडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय क्रिकेट संघात घ्यावे अशी सर्वांची आग्रही मागणी आहे. आयपीएलच्या तीनही सामन्यात त्याने डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी कमीत कमी 15 वर्षांचा खेळाडू हवा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ऐन उमेदीच्या काळात पाकिस्तानविरोधात धावांची लड लावली होती. आता वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे त्याला कारकि‍र्दीत अनेक विश्व विक्रम नोंदवण्याची संधी मिळेल.

कोणत्या खेळाडूची जागा घेणार?

वैभव सूर्यवंशी हा स्फोटक फलंदाज आहे. तो सलामीवीर आहे. त्याच्या फलंदाजीचा अंदाज आणि आक्रमक खेळी पाहता तो अनेक विक्रम नावावर नोंदवू शकतो. वैभवने टी-20 आणि IPL 2026 मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. भारताच्या टी20 संघात तो कधी जागा घेणार आणि कोणत्या खेळाडूच्या जागी त्याला घेणार हा प्रश्न कायम आहे. वैभव सूर्यवंशी हा घरगुती क्रिकेट आणि आयपीएल सामन्यात सलामीला उतरतो. नवीन चेंडूला घायाळ करण्यात त्याला मोठा आनंद येतो. तर गोलंदाजाची दमछाक करणे त्याला आवडते. मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याने दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पहिल्याच चेंडूत षटकार ठोकून त्याला दयामाय नसल्याचे दाखवून दिले. तो दबावाखाली खेळत नसल्याचेही समोर आले. भारतीय संघाचा, Team India चा विचार करता, सध्या संघाच्या वरच्या फळीत दुसरा खेळाडू सामावेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा करण्यासाठी थोडा कालावधी कळ सोसावी लागेल. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन हे 3 दमदार फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये आहेत. तिलक वर्मा अजून प्रतिक्षा यादीत आहे. सॅमसनने त्याची जागा घेतल्यापासून त्याला क्रमवारीत थोडं खाली खेळावं लागत आहे.

मग क्रमवारीत 5 व्या अथवा 6 व्या स्थानी संधी?

वैभव सूर्यवंशी सलामीवीर म्हणून ओळखल्या जातो. संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तो जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे क्रमवारीत त्याला टॉप ऑर्डरनंतर खेळवल्यास त्याचा कितपत उपयोग होईल याविषयी साशंकता आहे. आतापर्यंत त्याने T-20 मधील 21 सामन्यांमध्ये 3 शतक आणि दोन अर्धशतकसहीत 823 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये पण त्याची दमदार कामगिरी दिसली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles