पत्रकार संजय पिळणकर यांना ‘ज्ञानदीप’चा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर! ; २० वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान!

सावंतवाडी : पत्रकारितेसह समाजाच्या विविध क्षेत्रांत गेली दोन दशके सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार संजय पिळणकर यांना सन २०२६ साठी ‘ज्ञानदीप’चा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदाही जिल्ह्यातील गुणवंत व्यक्तींना बहाल करण्यात येणार आहे.  शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड समितीमार्फत काटेकोरपणे निवड करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून समाजासाठी मोलाची सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये सुरेश जानू काळे, सायली सीताराम लांबोर, संगीता तानाजी सोनटक्के, पत्रकार संजय पिळणकर, विलास अर्जुन कासकर, दीपक राऊळ, आनंद महादेव देवळी आणि आनंदी रुघनाथ घोटे यांचा समावेश आहे.
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ही माहिती जाहीर करताना, समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे स्पष्ट केले. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पुरस्कार घोषणेमुळे जिल्ह्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून निवड झालेल्या मान्यवरांचे अभिनंदन होत आहे. पत्रकार संजय पिळणकर यांनी पत्रकारितेसह रक्तदान, शैक्षणिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेत योग्य व्यक्तीची निवड झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles