कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत आदर, आपुलकी आणि स्नेहभाव यांचे सुंदर दर्शन घडले.
या प्रसंगी संजू परब यांनी राणे साहेबांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. राणे साहेबांनीही या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत उपस्थितांशी आत्मीय संवाद साधला. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळत राजकीय प्रवासातील अनेक अनुभवांची देवाणघेवाण झाली.
या खास प्रसंगी राज्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब तसेच जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब हेही उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी राणे साहेबांच्या नेतृत्वगुणांचा, कार्यशैलीचा व जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली ही सदिच्छा भेट केवळ औपचारिक नसून, ती राजकीय स्नेह, परस्पर आदर आणि सहकार्याचे प्रतीक असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले.



