अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची घोषणा. ; सिद्धेश सावंत अध्यक्ष, सिद्धेश पुरलकर सचिव, विशाल पित्रे यांची उपाध्यक्षपदी तर संघटकपदी प्रशांत मोरजकर यांची निवड. ; जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी त्रिविक्रम सावंत यांची निवड.

सावंतवाडी :  अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सिताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक तसेच जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत डिजिटल तंत्रज्ञानातील अत्यंत अभ्यासू युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सिद्धेश पुरलकर यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच विशाल पित्रे यांची उपाध्यक्षपदी तर संघटकपदी प्रशांत मोरजकर, भिकाजी धोंड यांची खजिनदारपदी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून साबाजी परब यांची आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी त्रिविक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून शुभम सावंत, श्रीरंग सावंत, संदीप राऊळ, आशिष धोंड, धनराज सगम यांची निवड करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीकडून डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटन मजबूत करणे आणि पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नूतन पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, राज्य सचिव तेजस राऊत यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles