पालकमंत्री नितेश राणे यांचा झंझावात, भुईबावड्यात उबाठा केले भुईसपाट! ; उबाठाकडून जि. प. निवडणुकीत फॉर्म भरलेले उमेदवार सुनील नारकर आणले भाजपात!

वैभववाडी : नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार सुनील नारकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासोबत भुईबावडा परिसरातील असंख्य उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाचा मुहूर्त साधात श्री नारकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. नितेश राणे यांनी नारकर व इतर सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यांच्या प्रवेशाने भुईबावडा परिसरातील उरलीसुरली उबाठा सेना संपुष्टात आली आहे.


प्रवेश करणा-यामध्ये वैभववाडी वार्ड क्रमांक 9 चे शाखाप्रमुख वैभव परब, मंगेश नाधवडेकर, अजिंक्य नारकर, सुरज मोरे, प्रथमेश पाटील, ओंकार पांचाळ, कौशिक घाडी, दिवेश गजोबार, अक्षय पंडित, रोशन बर्गे, वैभव सुतार, मिहीर रावराणे, परेश सावंत, विनोद निकम, सुनिल साबळे, सुमित निकम, तेजस बोडेकर, राहुल पांचाळ, महेश परब, नरेंद्र सुतार, अमर वारके, व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सुनील नारकर हे मुंबईत उद्योजक म्हणून परिचित आहे. ते भुईबावडा गाव येथील रहिवासी आहेत. सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे योगदान आहे. पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये त्यांनी उबाठा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. ते काही दिवस उबाठा गटावर नाराज होते. अखेर पक्ष संघटनेला कंटाळून त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles