सावंतवाडी : समाजप्रबोधनाच्या तेजस्वी सूर्याला अभिवादन करताना केवळ पुष्पहार नव्हे, तर विचारांचा दीप प्रज्वलित करणे हेच खरे पूजन! अशा ओजस्वी शब्दांत भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाची ठाम भूमिका मांडली.
महात्मा फुले यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांच्याविरुद्ध उभारलेला लढा आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. “शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मंत्र” हे त्यांचे विचार आज भाजपा कार्यकर्त्यांच्या कृतीतून जिवंत होत असल्याचे परब यांनी ठामपणे सांगितले. “समाजाच्या तळागाळापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून, त्यासाठी आम्ही शंभर टक्के ताकदीने कार्यरत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब यांनी उभारलेली शैक्षणिक चळवळ आज खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी ठरत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दप्तर वितरण, क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांना प्रोत्साहन अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते केवळ युवा नेतेच नव्हे, तर “शिक्षणासाठी झटणारे समाजभान असलेले नेतृत्व” म्हणून उदयास आले आहेत.
“महापुरुषांचे केवळ फोटो लावणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी श्रद्धांजली,” असे ठाम प्रतिपादन करत परब यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या माध्यमातून नव्या परिवर्तनाची वाट घडवत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
यावेळी सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सोशल मीडिया अध्यक्ष केतन आजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर, साईप्रसाद भोई यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.



