सावंतवाडीच्या युवा प्रतिभावंत कवयित्री स्नेहा कदम यांनी गाजवले दिल्लीचे विचारपीठ!

सावंतवाडी: दिल्ली येथे साहित्य अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय आयोजित “फेस्टिव्हल ऑफ लेटर्स” या साहित्य सोहळ्यातील बहुभाषिक युवा काव्य संमेलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना स्नेहा विठ्ठल कदम हिने आपल्या खास शैलीत आणि दमदार आवाजात कवितेचे सादरीकरण केले. तिने सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
या संमेलनासाठी खास निमंत्रित करण्यात आलेल्या स्नेहा कदम हिने काव्य संमेलनात मराठी भाषेतून त्याप्रमाणेच हिंदी, इंग्लिश भाषेतून कविता सादर केली. यावेळी मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्लिश अनुवादीत कविंतांचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक केले. या संमेलनात मान्यवरांच्याहस्ते स्नेहा कदम हिचा विशेष गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कवि संमेलनात उर्दू, डोंगरी, कन्नड, पंजाबी, सिंधी, हिंदी, इंग्लिश या भाषांमधून आपल्या देशातील विविध राज्यांतील अनेक अव्वल युवा कवींनीही आपल्या कविता सादर केल्या. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक जाण असलेली युवा कवियित्री स्नेहा विठ्ठल कदम हिने महाराष्ट्राचा पर्यायाने सावंतवाडीचा काव्यरुपी आवाज दिल्ली दरबारी पोचवल्याबद्दल तिचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles