माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये १८ एप्रिल रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन.

✍️ विलास जंगले.

सावंतवाडी : शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल ता. सावंतवाडी च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलमार्फत दिनांक १८ एप्रिल रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अशौरन्स या डिपार्टमेंटस साठी गोवा मधील नामांकित
फार्मा कंपनी या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये सहभागी होणार आहे.
याच बरोबर गतवर्षी प्रमाणेच यावर्षी ही विविध फार्मास्युटिकल कंपन्याचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्याचे संस्थेने योजले आहे.
सदरील कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये महाविद्यालयाच्या डी फार्म, बी फार्म आणि एम फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles