माजगावच्या विकासाचा ध्यास, हाच आमचा श्वास : विक्रांत सावंत. ; माजगाववर भगवा फडकवून विकासाच्या नवा झंझावाताचा निर्धार!

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय रणांगण पेटलं असून वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे.  महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रंजना रवि कानसे यांच्या विजयासाठी महायुतीने रणशिंग फुंकलं असून, “यावेळी फक्त विजय नाही, तर दणदणीत विजयच!” असा निर्धार व्यक्त होत आहे.

राजकीय घमासान सुरू!

माजगावमध्ये सत्तेचा झेंडा पुन्हा भगवाच फडकणार, असा ठाम विश्वास जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

एकच निर्धार – माजगाववर भगवा, विकासाचा नवा झंझावात!

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी यावेळी विरोधकांना चांगलाच इशारा दिलाय. ते म्हणाले “श्री देव महादेव आणि देवी सातेरीच्या आशीर्वादाने माजगावच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतलाय. आता ही निवडणूक फक्त सत्ता बदलाची नाही, तर विकास विरुद्ध अडथळे अशी लढाई आहे! २८ तारखेला महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करून विरोधकांना धूळ चारूया आणि माजगाव भगवामय करून दाखवूया!”

 भक्कम मार्गदर्शन आणि नेतृत्वाची ताकद : लोकप्रिय खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती एकजुटीने मैदानात उतरली आहे.

स्थानिक नेतृत्व सज्ज : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, रेश्मा सावंत, अशोक दळवी आदी नेत्यांनी गावागावात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles