वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी गावातील गावतळे शाळेत रेडीचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते नामदेव शिवाजी राणे यांच्याद्वारे पुरस्कृत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन (HB), साखर (Sugar), रक्तदाब (BP) तसेच ईसीजी (ECG) तपासणी करण्यात आली. रेडी गावतळे व गोळतुवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

या प्रसंगी रेडीचे सरपंच रामसिंग राणे यांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शिबिरादरम्यान श्रीमती अंकिता तोरसकर (CHO) यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास श्रीमती अंकिता तोरसकर (आरोग्य अधिकारी), जेनिफर डिसोझा (आरोग्य सेविका), श्रीमती ज्योती कदम (NCD स्टाफ नर्स), प्रसन्न कांबळे (आरोग्य सेवक), आशा स्वयंसेविका सौ. जयश्री राणे, संगीता शिरोडकर, CRP श्रुती केरकर, अंगणवाडी सेविका सौ. प्रांजल राणे तसेच मदतनीस सौ. दिपीका मांजरेकर आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी नामदेव राणे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. लाभार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



