सैनिक स्कूल आंबोली येथे साहसी व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराचे आयोजन.

– साबाजी परब.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली च्या वतीने साहसी व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ व २५ एप्रिल २०२६ ते ०१ मे २०२६ पर्यत आयोजित करण्यात आले आहे. ह्याच शिबीराचे औचित्य साधून दि.२० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी व दुर्ग मावळा प्रतिष्ठान तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , भारत ह्यांच्या वतीने इतिहासाची साधने व प्रदर्शन हा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक श्री ज्ञानेश्वर राणे ह्यांनी मुलांना शिव इतिहास व गड कोट दुर्गाचे संवर्धन ह्यांचे महत्त्व सांगितले तसेच अफजलखान वध हा ऐतिहासिक प्रसंग मुलांकडून प्रत्यक्ष रित्या शस्त्र घेऊन करवून घेतला ऐतिहासिक दृष्ट्या लावलेल्या प्रदर्शनात ऐतिहासिक भौतिक साधने, लिखित साधने व शस्त्र व आरमारी जहाजाचे फोटो प्रदर्शन लावण्यात आले होते शस्त्रामध्ये प्रामुख्याने मराठा धोप , मराठा गुर्ज, वाघनखे , कट्यार , दांडपट्टा , खंडा तरवार , ढाल जिरेटोप तसेच इतर ऐतिहासिक शस्त्राचा समावेश होता सदर कार्यक्रमास दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे सदस्य श्री राजाराम(आबा) चिपकर व एज्युकेशन इन्स्ट्रक्टर सुभेदार शिवराज पवार ऑनरी कॅप्टन जयराम कोळी ज्येष्ठ शिक्षक एस के गावडे कॅम्प कमांडर दत्ता वावधने शिक्षक परमेश्वर सावळे हंबीरराव अडकुरकर एस एन पोद्दार आर पी माने संतोष राऊळ उदय घारे कोच सतीश अहिर डी कर्नल अकॅडमी फॉर एडवेंचर अँड एरोस्पोर्टस मधील सहभागी प्रशिक्षणार्थी सैनिक स्कूलचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व सदरच्या कार्यक्रम व संस्थेच्या उपक्रमास प्राचार्य एनडी गावडे यांनी शुभेच्छा दिल्या व आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles