सावंतवाडी: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या २०२६ घ्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. पत्रकारितेचा ‘ जीवन गौरव ‘ पुरस्कार साप्ताहिक सरहद्दचे कार्यकारी संपादक श्री. राजू तावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवदूत’ म्हणून डॉ. प्रविण मसुरकर, ‘समाजाभिमुख पत्रकार’ म्हणून शिवप्रसाद देसाई, तर पत्रकारितेतील सेवेसाठी राजू तावडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. दिलीप भारमल यांची ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून, तर साहित्य आणि कला क्षेत्रात द.म. गवस गुरुजी यांची ‘उत्कृष्ट कवी’ आणि बाबल गांवकर यांची ‘उत्कृष्ट हार्मोनियम वादक’ म्हणून तसेच क्रीडा क्षेत्रात कबीर हेरेकर यांची ‘उत्कृष्ट क्रीडापटू ‘ तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेश उर्फ गुंडू जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



