सावंतवाडीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी थेट ‘मातोश्री’वर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी साधला राजकीय सुसंवाद!

मुंबई / सावंतवाडी : आगामी राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हालचालींना वेग आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी थेट मुंबई गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या ‘हाय व्होल्टेज’ भेटीत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, तालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख आबा केरकर व सुनील गावडे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे माजी खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली.
विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, सावंतवाडीतील बदलती राजकीय समीकरणे, पक्षसंघटनेतील बळकटी आणि आगामी निवडणुकांची आखणी यावर सविस्तर खलबते झाली. काही महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत पक्के झाल्याची चर्चा असून, उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’मध्ये राहण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचे समजते.
या भेटीनंतर सावंतवाडीच्या राजकारणात ‘नवे ट्विस्ट’ येण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक पातळीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. आता पुढील काही दिवसांत ठाकरे गट कोणते पाऊल उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles