सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सलंग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता येथील शिल्पग्राम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून पत्रकारांच्या पाल्यांचाही गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणे गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद सदस्य युवा नेते विक्रांत सावंत यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब, उपनगराध्यक्ष ॲड . अनिल निरवडेकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी मान्यवरांचीही सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात रुपेश हिराप, भगवान शेलटे, मंगल नाईक-जोशी, अभय पंडित, संतोष परब, हेमंत काळसेकर यांच्यासह विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा तसेच पत्रकार बांधवांच्या गुणवंत पाल्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.



