लाडक्या बहिणींसाठी सरकार घेणार मोठा निर्णय. ; मंत्रालयात हालचाली सुरू.

मुंबई : लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन ही बातमी वाचा कारण लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचं पहायला मिळत आहे. फक्त राज्यातीलच नव्हे संपूर्ण देशातील लाडक्या बहिणींसाठी, महिलांसाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात उतरलं आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महिला आरक्षणासाठी घेण्यात येणारं हे एक दिवसीय विशेष अधिवेशन में महिन्यात पार पडणार आहे. मात्र असं असलं तरी ते नेमकं कधी होणार याच्या तारखे संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. पण लवकरच ती तारीख जाहीर होईल. या एकदिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार भूमिका मांडणार असल्याचं समजतं.

महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026, डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (दुरुस्ती) विधेयक 2026 यावर गेल्या आठवड्यात संसदेत चर्चा झाली. यानंतर 131व्या संविधान दुरुस्तीवर चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आलं. मात्र हे विधयक मंजूर झालं नाही. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles