पाणी फाऊंडेशनची ‘फार्मर स्पर्धा’ कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान.

सिंधुदुर्ग : पाणी फाऊंडेशनची फार्मर स्पर्धा कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ही स्पर्धा आमिर खान यांची पाणी फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्र शासन कृषी विभाग व उमेद अभियान यांच्या सहकार्याने राबवत आहे.
कोकणातील शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे व ती विखुरलेल्या स्वरूपात आहे यामुळे विविध प्रकारच्या मोठ्या योजना तसेच सहकार शेती कृषी यांत्रिकरण राबवणे अवघड जात आहे परंतु यावर मात करून छोट्या छोट्या गटांमध्ये एकत्र येऊन शेतकऱ्यांना गट शेती करता येऊ शकते. अशा लहान शेतकऱ्यांना एकत्र येऊन गट शेती करण्यासाठी व इतर अडचणी सोडवण्यासाठी पाणी फाऊंडेशनची फार्मर कप स्पर्धा ही अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची व जाचक अटींची अडचण असणार नाही फक्त खालीलपैकी कोणत्याही एका पिकाचे दहा एकर क्षेत्र व 11 शेतकरी एकत्र आल्यास या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.

स्वतःच्या नावावर शेती असलेले तसेच खंडाने किंवा भाडेपट्ट्यावर किंवा कराराने शेती घेऊन शेती करणारे शेतकरी किंवा महिला या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक पीक करणारे 11 शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करून त्या गटाची नोंदणी पाणी फाउंडेशनच्या स्मार्ट शेती या ॲपवर करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये मुख्यत्वे करून गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जमिनीची मशागत बियाणे खरेदी खते खरेदी , बीज प्रक्रिया आंतरमशागतीची कामे पेरणी व लागवडीची कामे किडरोग नियंत्रण इत्यादी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन घ्यावयाचे आहे. ई पीक पाहणी कापणी मळणी प्रक्रिया तसेच शासकीय धान्य खरेदीसाठी नोंदणी ही सर्व कामे गटाने एकत्रित पणे करावयाचे आहेत.
ही स्पर्धा २०२६–२७
खरीप हंगामातील पिकांसाठी आहे

स्पर्धेचे वेळापत्रक –
सुरुवातीची तारीख: १५ मे २०२६
शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२७

खरीपातील ३६ मुख्य पिके –
या स्पर्धेत कोकणातील खरीप हंगामातील भात नाचणी भाजीपाला पिके याबरोबरच राज्यातील पुढील अन्य पिकांचाही समावेश आहे
बटाटा, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, मका
, भूईमूग, तूर, उडीद, , कांदा
टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, कोबी, शिमला मिरची
भोपळा, रताळे, घेवडा, वाटाणा, कोथिंबीर, मेथी
पालक, गवार, पडवळ, तोंडली, घोसाळी, फुलपिके

गट स्थापनेचे नियम व अटी –
गटाचे स्वरूप: गट पिकनिहाय
सदस्य संख्या: किमान 11 कुटुंबातील शेतकरी
क्षेत्र: किमान १० एकर शेती.

क्षेत्राची मर्यादा –

एका सदस्याचे क्षेत्र ३०% पेक्षा जास्त नसावे.

गट प्रकार – महिला, पुरुष किंवा मिश्र.

व्याप्ती –  एका गावातील किंवा अधिक गावातील शेतकरी
सदस्यत्व: एक शेतकरी २ गटांचा सदस्य असू शकतो
राज्यस्तरीय बक्षिसांचे स्वरूप
🥇 प्रथम क्रमांक: ५० लाख रुपये
🥈 द्वितीय क्रमांक: ३० लाख रुपये
🥉 तृतीय क्रमांक: २० लाख रुपये
महिला गटांसाठी विशेष राज्यस्तरीय बक्षिसे
३ विशेष बक्षिसे – प्रत्येक १० लाख रुपये.

इतर प्रोत्साहन –
तसेच जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गटात रुपये पाच लाख द्वितीय गटास रुपये तीन लाख व तृतीय क्रमांक पटकावणारे गटात रुपये दोन लाख रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. बक्षीसाबरोबरच निविष्ठांची एकत्र खरेदी सामूहिक पद्धतीने शेतीमधील केलेली विविध कामे यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होणार आहे.या स्पर्धेत कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कोकण विभाग ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक श्री शिवाजीराव आमले साहेब हे विशेष प्रयत्नशील व आग्रही आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग किंवा उमेद अभियानाच्या मेंटॉरशी किंवा पाणी फाऊंडेशनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी तालुक्यासाठी कृषि विभागाचे मेंटॉर यशवंत गव्हाणे व मिलिंद निकम यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles