आ. प्रमोद जठार यांचे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन! ; जिल्ह्यात होणार जल्लोषी स्वागत!

सिंधुदुर्गनगरी: भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदार  प्रमोद  जठार यांचा निवडीनंतरचा पहिलाच जिल्हा दौरा उद्या गुरुवार, दि. ७  मे रोजी उत्साहात पार पडणार असून, त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात भव्य आणि जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या स्वागत दौऱ्यात विविध ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार जठार यांचे अभिनंदन करणार आहेत. या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:
🕙 सकाळी १०.०० वा. – दोडामार्ग भाजपा कार्यालय
🕦 सकाळी ११.३० वा. – सावंतवाडी भाजपा मध्यवर्ती कार्यालय
🕐 दुपारी १.०० वा. – वेंगुर्ले भाजपा कार्यालय
🕓 सायंकाळी ४.०० वा. – कुडाळ भाजपा कार्यालय
🕕 सायंकाळी ६.०० वा. – मालवण भाजपा कार्यालय
या दौऱ्याच्या निमित्ताने मा. आमदारांशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे वार्तांकन करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. श्री. महेश सारंग यांनी केले आहे.
हा दौरा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, पक्षाच्या बळकटीसाठी नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles