अखेर महागाईचा बॉम्ब फुटला! ; मागच्या ४८ तासात कुठल्या-कुठल्या वस्तुंचे दर वाढले, सर्वसामान्य बेजार.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील जनतेला सावध करताना काही महत्वाची आवाहनं केली होती. त्यानंतर मागच्या 48 तासात एकापाठोपाठ एक अनेक गोष्टी महागल्या आहेत. देशातील जनतेवर महागाईने चहूबाजूंनी हल्लाबोल केला आहे. सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ झाली. सोन्या-चांदीचे भाव वाढले. फक्त सोनचं नाही, यानंतर देशात दूधाचे दर वाढले. सीएनजीच्या किंमती वाढल्या. आता पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. हे एकप्रकारे महागाईचा बॉम्ब फुटण्यासारखचं आहे. शुक्रवारी 15 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल-डिझेल प्रति लीटर 3 रुपयांनी महागलं आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी देशातील जनतेला वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर 24 तासात पुन्हा तेच आवाहन केलं. त्यानंतर सरकारने अचानक सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं. MCX पासून देशातंर्गत बाजारपेठेपर्यंत सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली. आयात शुल्क वाढवल्याची बातमी येताच सोनं 11 हजार रुपये आणि चांदी 22 हजार रुपयापर्यंत महागली.

नव्या किंमती 14 मे पासून –

सोन्या-चांदीच्या दरानंतर महागाईचा दुसरा बॉम्ब दुधावर फुटला. अमूलपासून मदर डेयरी पर्यंत पॅकेज्ड दूधाच्या किंमती वाढवून देशातील जनतेला झटका दिला आहे. अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर 2 रुपये वाढ झाली. त्यानंतर मदर डेअरीने सुद्धा आपले दर 2 रुपयांनी वाढवले. नव्या किंमती 14 मे पासून देशभरात लागू होतील.

मुंबईत पेट्रोलचा नवीन दर काय?

दूधा नंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली. नव्या किंमती 15 मे पासून देशभरात लागू होतील. 3 रुपये दरवाढीनंतर दिल्लीत आता प्रति लिटर पेट्रोल 97.77 रुपये असेल. कोलकात्यात 108.74 रुपये, मुंबईत 106.68 रुपये, चेन्नईत 103.67 रुपये असेल.

डिझेलबद्दल बोलायचं झाल्यास दिल्लीत प्रति लिटर डिझेल 90.67 रुपये, कोलकात्यात 95.13 रुपये, मुंबईत 93.14 रुपये आणि चेन्नईत 95.25 रुपये प्रति लीटर नवीन दर असेल.

सीएनजीचे रेट सुद्धा वाढले –

फक्त पेट्रोल-डिझेलचेच दर वाढलेले नाहीत तर सीएनजीचे रेट सुद्धा वाढले आहे. याचा रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईनंतर आता दिल्लीतही 15 मे पासून सीएनजी महाग झाला आहे. दिल्लीत आता प्रतिकिलो सीएनजीचा दर 79.09 रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles