जिजाऊ संस्थेच्या सामाजिक कार्याला सलाम! ; २५ महिलांना संस्थेच्या वतीने घरघंटी वाटप.

शहापूर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत जिजाऊ संघटना शहापूर यांच्या वतीने अल्प दरात घरघंटी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय, आसनगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये एकूण २५ महिलांना अल्प दरात घरघंटीचे वाटप करण्यात आले. महिलांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक बचत व्हावी तसेच घरगुती व्यवसायाला चालना मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी दिली.

यावेळी जिजाऊ संघटनेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे, मोनिका पानवे, दिनेश निमसे, सुदर्शन पाटील, रंजना उघडा, जनार्दन भेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ संघटना शहापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. विनोद निमसे, किशोर धसाडे, कामिनी भालके यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला. उपस्थित महिलांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles