डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेनं दिला धोका! ; चीनमधून अत्यंत वाईट बातमी.

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. अमेरिका आणि इरामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या बैठीककडे लागलं होतं. मात्र या बैठकीमधून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या पुर्वीच्या राष्ट्रपतींचं परराष्ट्र धोरण असं होतं की चीनला रोखण्यासाठी ते भारताकडे एक पर्याय म्हणून पाहात होते, चीनला रोखण्यासाठी भारताला ताकद पुरवण्याचं काम अनेकदा अमेरिकेकडून झालं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा यूटर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये अमेरिकेनं आता पहिल्यांदाच चीनला आपला मित्र बनवण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवरून चीनला रवाना होताना देखील चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. मी तुमचा मित्र आहे, हे सांगताना मला आनंद होतो असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चीनने तैवानवरून अमेरिकेला उघड-उघड धमकी दिली मात्र तरी देखील ट्रम्प शांतच होते, यावरूनच आता अमेरिकेला चीनसोबत मैत्री वाढवायची आहे, हे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतासंदर्भात मोठं विधान केलं होतं. अमेरिका आता पुन्हा ती चूक करणार नाही जी आम्ही चीनसोबत केली होती. अमेरिकेनं चीनसाठी अनेक दशकं कोणत्याही अटी शर्थीशिवाय व्यापाराची दारं खुली केली, त्याचा परिणाम असा झाला की चीन एक बलाढ्य देश बनला आम्ही आमच्याच पैशांनी आमचा प्रतिस्पर्धी निर्माण केला. आता आम्ही भारतासोबत ही चूक करणार नाही असं अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. अमेरिकेची चीनसोबत वाढती जवळीक हा भारतासाठी मोठा धक्का असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles